खादरवाडी येथील मराठा मंडळ इंग्लिश मिडीयम स्कुल या शाळेने नुकत्याच झालेल्या झोनल पातळीवरील प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव २०२२-२३ मध्ये घवघवीत यश सांपडत करत १५ सुवर्ण आणि ३ रौपय पदके मिळविली आहेत.
व्हॉइस : किणये येथील सिद्धिविनायक इंग्लिश मिडीयम स्कुलतर्फे सलग दोन दिवस आयोजित करण्यात आलेला झोनल पातळीवरील प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव शनिवारी उत्साहात पार पडला. या महोत्सवात कुस्ती, ज्युडो आणि कराटे आदी क्रीडाप्रकारात या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत १५ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके पटकाविली. झोनल पातळीवरील विद्यार्थ्यांच्या उत्तम कामगिरीमुळे त्यांची निवड तालुका पातळीवरील क्रीडा महोत्सवासाठी झाली आहे.

झोनल पातळीवरील कुस्ती, ज्युडो व कराटे स्पर्धेत खादरवाडी मराठा मंडळ इंग्लिश शाळेच्या साहिल नंदगडकर, अजाण शरीफ मोहम्मद धामणेकर, जाहिद सय्यद, आदित्य सलाम, प्रथमेश बस्तवाडकर, स्वराज्य पाटील, आचल पाटील, भुवनेश्वरी, राधिका नेसरकर, श्रेया पाटील, भार्गवी सुतार, सुषमा शिंदे आणि अंकिता कंकणमेले या क्रीडापटुंनी उत्तम कामगिरी करत यश संपादन केले आहे.
या सर्व क्रीडापटूंना शाळेचे क्रीडा शिक्षक, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अतुल शिरोळे यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका वनश्री नायर आणि मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन लाभले. बेळगावचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अतुल शिरोळे हे बेळगावमधील उदयोन्मुख खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. त्यांचा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला असून या यशाबद्दल त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Recent Comments