चिकोडी तालुक्यातील मांजरी गावातील उर्दू शाळेच्या एस डी एम सी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड तसेच शाळेचे मुख्याध्यापक एन ए बागे यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

मांजरी येथील सरकारी उर्दू शाळेत आज एसडीएमसी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया तसेच मुख्याध्यापक एन ए बागे यांचा निरोप समारंभ पार पडला. एस डी एम सी अध्यक्षपदी महम्मद ताहीर पठाण तर उपाध्यक्षपदी जावेद मुल्ल्लानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर मुख्याध्यापक एन ए बागे आणि नूतन एस डी एम सी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी चिकोडी सरकारी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक ए बी शेंडूरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एन ए बागे यांनी आपल्या जीवनात आदर्श शिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांचे भावी आयुष्य सुख, शांती व समाधानाचे जावो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी माजी एस डी एम सी अध्यक्ष जाकीर तराळ, सिकंदर तांबोळे, यालीखान तराळ, नजरू तराळ, दस्तगीर मत्तीबई, मौलाना असिफ आदींसह शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments