बेळगाव मधील आरएलएस महाविद्यालयात हवामान बदल आणि त्याचे परिणाम या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. के. नि गुडसी म्हणाले, हवामान बदल एकाच वेळी होत नाहीत, परंतु हळूहळू बदल होत जातात आणि देशाच्या नैसर्गिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्व पैलूंवर परिणाम होतात. त्याच्या प्रभावामुळे जागतिक तापमानात अजूनही वाढ होत असल्याची चिंता प्रा. गुडसी यांनी व्यक्त केली.
रसायनशास्त्र विभागातर्फे आयोजित केलेल्या या चर्चासत्रात कर्नाटक विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. के. बी गुडसी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हवामान बदल आणि त्याचे परिणाम या विषयावर आपली मते मांडली. आपणदेखील बेळगावचाच रहिवासी असून याच महाविद्यालयात आपण शिक्षण घेतल्याचे ते म्हणाले. तसेच भविष्यात या संस्थेतील विद्यार्थ्यांनीही सी. व्ही. रमण यांच्यासारखे नोबेल पारितोषिक जिंकून या संस्थेचे नाव कमवावे, असे आवाहन त्यांनी केले.
हवामान बदल आणि त्याचे परिणाम या राष्ट्रीय चर्चासत्राच्या विषयावर बोलताना त्यांनी हवामानात बदल का आणि कसे होतात याबद्दल माहिती दिली. हवामान बद, मानवजातीची समस्या, आणि नियंत्रण यासंदर्भात त्यांनी विचार व्यक्त केले. हवामानातील बदलानुसार जीवनशैली कशी बदलली पाहिजे, हा विषय त्यांनी सविस्तरपणे मांडला. तसेच वातावरणातील जागतिक तापमानात झालेली वाढ, अवकाळी अतिवृष्टी, जंगली वादळे, गारपीट आदींमुळे विविध प्रकारची नैसर्गिक आपत्ती येऊन मानवजातीला अस्थिरता निर्माण होत असल्याबद्दल प्रा. के. बी गुडसी यांनी चिंता व्यक्त केली.
यावेळी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. स्थानिक प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष व्ही एल देसाई हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्राचार्या डॉ. ज्योती कवळेकर, डॉ. बी जी बेविनकट्टी, डॉ. सतीश एम पी, पुरुषोत्तम आय, एस डी गोरीनायक, डॉ. कीर्ती ब्याडगी, व्ही एस बेटगेरी आदींसह रसायन शास्त्र विभागाचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments