Belagavi

जन्म-मृत्यू नोंदणी कार्यक्षेत्र बदलाच्या निषेधार्थ वकिलांचे आंदोलन

Share

जन्ममृत्यू निबंधकांचे कार्यक्षेत्र जेएमएफसी न्यायालयाकडून प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत हस्तांतरित करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात बेळगाव बार असोसिएशनच्या सदस्यांनी बेळगावात आज निदर्शने केली.

होय, कर्नाटक राज्य सरकारने 18/07/2022 रोजी जन्म आणि मृत्यू नोंदणीसंबंधी एक नवीन परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये जन्म आणि मृत्यू निबंधकाचे अधिकार क्षेत्र जेएमएफसी न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रातून हस्तांतरित करण्यात आले आहे. नव्या परिपत्रकानुसार हे अधिकार आता प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याच्या निषेधार्थ वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन केले. यावेळी वकिलांनी मोर्चा काढून माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सरकारने काही दिवसांपूर्वी नियमांत बदल करून जेएमएफसी न्यायालयापासून जन्म आणि मृत्यू नोंदणीचे अधिकार हिरावून घेऊन प्रांताधिकाऱ्यांना हे अधिकार दिले आहेत. मात्र यामुळे आगामी काळात राज्यात आणखी समस्या भेडसावणार आहेत. जनतेला आणखी त्रास होईल. पुढील प्रांताधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळात कागदपत्रांमध्ये सुधारणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेळगाव बार असोसिएशन याचा तीव्र निषेध करते. सरकारने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा आगामी काळात तीव्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, उपाध्यक्ष सचिन शिवण्णावर, सुधीर चव्हाण, सचिव गिरिराज पाटील, सहसचिव बंटी कपाही, महेश पाटील, अभिषेक उदोशी, आदर्श पाटील आदी उपस्थित होते.

Tags: