Hukkeri

श्रावण मासारंभ! हुक्केरी मठात विविधधार्मिक कार्यक्रम

Share

बेळगावमधील हुक्केरी हिरेमठ येथे २९ जुलै ते २२ ऑगस्ट पर्यंत श्रावण मासानिमित्त दररोज इष्टलिंग रुद्राभिषेक तसेच गुरूशांतेश्वर मूर्ती रुद्राभिषेक, महामंगलारती पूजा होणार आहे, अशी माहिती परमपूज्य चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी दिली.

श्रावण महिन्यात प्रत्येक मंदिरात धार्मिक विधींचे आयोजन केले जाते. दररोज विविध पद्धतीची आरास आणि सजावट देखील करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर हुक्केरी हिरेमठात देखील विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ९ पासून रुद्राभिषेक, महामंगलारती, सायंकाळी ६ वाजता कुंकुमार्चन तसेच २४ ऑगस्ट रोजी बेळगाव हुक्केरी हिरेमठात इष्टलिंग दीक्षा, महाप्रसाद, सुवासिनींनी ओटी भरणे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार पासून सुरु झालेल्या श्रावण मासाच्या प्रारंभी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, श्रावण महिन्यात सर्वत्र उत्सवाचे वातावरण असते. मठ, मंदिरे आणि अनेक देवस्थानात विविध धार्मिक विधींचे आयोजन केले जाते. याचप्रमाणे बेळगाव श्रीमठात भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी कटकोळ एम चंदरगी उत्तराधिकाऱ्यांतर्फे रेणुका गडगेश्वर देवाचे विशेष रुद्रपठण करण्यात आले. चिकोडी वेदमूर्ती महांतेश शास्त्री, शिवपुत्र शास्त्री, उगरकोडचे महांतेश शास्त्री, चेतनकुमार शास्त्री, वैदिकत्व पूर्ण केले. यावेळी सुमंगला शिंत्रे यांच्यासह अनेक भाविकांनी महामंगलारतीत सहभाग घेतला.

Tags: