गोकाक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिल्टीभावी गावातील उसाच्या फडात आपल्याच ४ वर्षाच्या मुलाचा खून करून आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले.
बेळगावातील आपल्या कार्यालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना एसपी डॉ. संजीव पाटील म्हणाले, बुधवारी दुपारी शिल्टीभावी गावातील उसाच्या शेतात चार वर्षांचा मुलगा मृतावस्थेत आढळून आला. मुलाच्या आईच्या मानेलाही चिरून जखमी केले होते. याप्रकरणी गोकाक पोलीस ठाण्यात 302 व 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास केला असता जखमी महिलेचा पती पत्नीसोबत वारंवार भांडण करत असल्याचे निष्पन्न झाले. शेतात गेल्यावर दोघांमध्ये हाणामारी झाली आणि त्याने आपल्याजवळ असलेल्या शस्त्राने मुलाचा गळा चिरून खून केला. तसेच पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गुन्हा दाखल : एसपी डॉ. संजीव पाटील

Recent Comments