Vijayapura

कृष्णा तीरावर आढळली अनोखी मगर!

Share

मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली आहे. कृष्णा नदीतीरावर असणाऱ्या घाळपूजी या गावात एक विचित्र प्रकारची मगर आढळून आली असून हि मगर पाहून येथील नागरिक अचंबित झाले आहेत.

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून या पाण्याच्या प्रवाहात एक विचित्र प्रकारची मगर आढळून आली आहे. घाळपूजी या गावात हि मगर आढळून आली असून नदीप्रवाहातून सदर मगर हि सपाट आणि लांब तोंडाची आहे. येथील शेतकरी बसवराज शंकरान्ना हुनकुंटी यांच्या पाण्याच्या टाकीत हि मगर आढळून आली आहे. सकाळी हि मगर पाहून हुनकुंटी कुटुंब भयभीत झाले. नदीचे पाणी वाढल्याने मगरीचे पिलू शेतकऱ्याच्या घरातील पाण्याच्या टाकीत शिरले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान ग्रामस्थांनी हि बाब वनखात्याच्या अधिकाऱ्यांना कळविली. यानंतर वन खात्याचे विजयकुमार कित्तुर तसेच मुत्तन्न सरूर यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांच्या मदतीने दोन फूट लांबीच्या मगरीला जेरबंद करण्यात आले. या मगरीला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. सदर मगर नारायणपूर जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये सोडण्यात येईल, असे वनविभागाचे विजयकुमार यांनी सांगितले. पाण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाहातून येणाऱ्या मगरी या लोकवस्तीत अन्नपदार्थांच्या शोधात येत असून यामुळे गावकऱ्यांना जनावरे नदीकाठच्या परिसरात सोडणे मुश्किल झाले आहे.

Tags: