Hukkeri

वनविभागाची जमीन अनुसूचित जातीच्या कुटुंबांना द्या : केएमएससी कुटुंबांची मागणी

Share

हुक्केरी तालुक्यातील नागनूर के एम गावातील अनुसूचित जातीतील काही कुटुंब वनविभागाच्या जमिनीवर शेती करतात. गेल्या ५० वर्षांपासून या जमिनीवर शेती करण्यात येत असून हि जमीन सरकारने अनुसूचित जातीच्या कुटुंबांना द्यावी, अशी मागणी करत नागनूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

हुक्केरी तालुक्यातील नागनूर के एम या गावात ३० कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून वन विभागाच्या जमिनीवर शेती करत आहेत. या जमिनीच्या माध्यमातून उपजीविका करणाऱ्या कुटुंबातील १३ जणांवर वनविभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या यासंदर्भात हुक्केरी तालुका न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात दंड आणि शिक्षेची तरतूद केली आहे. यामुळे सरकारने वनविभागाची जमीन अनुसूचित जातीच्या कुटुंबांना द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात छेडण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांना उद्देशुन बोलताना ग्रामस्थाने सांगितले, ३० कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून या वनविभागाच्या जमिनीवर शेती पिकवून आपली उपजीविका करत आहेत. हि जमीन वगळता आपल्याकडे इतर कोणतेही उपजीविकेचे साधन नाही. याचसंदर्भात वनविभागाने १३ जणांवर तक्रर दाखल केली असून आतापर्यंत पिकवत आलेल्या जमिनीचा ताबा सरकारने आम्हाला द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सदर जमिनीवर पिकविण्यात येणारी शेती हि बेकायदेशीर असून कायदेशीर रित्या हि शेतजमीन अनुसूचित कुटुंबियांच्या नावे करण्यात यावी, अशी मागणी करत निवेदन सादर करण्यात आले आहे.

Tags: