Belagavi

स्वयंरोजगाराने महिला अबला नाही तर सबला होतात हे सिद्ध करा : दुग्गेगौड

Share

स्वतःचा व्यवसाय स्वतःच सांभाळायला हवा, नोकरी नाही हा ताण बाळगण्यापेक्षा एखादा व्यवसाय करावा, स्वतःच्या जीवनाचा मार्ग शोधण्यासाठी महिला अबला नाहीत तर सबला आहेत हे स्वयंरोजगारातून सिद्ध करा, असे आवाहन धारवाड प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक दुग्गेगौड यांनी केले.

व्हॉइस : धर्मस्थळ ग्रामविकास योजना खासबाग येथील महिला ज्ञान विकास कार्यक्रमांतर्गत बेळगावमधील वडगाव येथील दुर्गादेवी सभागृहात उद्योजकता शिबिरात ते बोलत होते. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण झाले तर मातोश्री हेमावतींचे स्वप्न साकार होऊ शकते. आपल्या देशाच्या विकासाची दिशा बदलू शकते असे मत त्यांना व्यक्त केले.

 

मातोश्री हेमवती यांच्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून गृहउद्योगाचे स्वप्न साकार करणाऱ्या संस्थेच्या कार्याचे उपस्थित सदस्यांनी कौतुक केले.

 

यावेळी गृहउद्योजिका म्हणून कार्य करणाऱ्या ५० महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींची उत्पादने प्रदर्शनाकरिता ठेवण्यात आली होती.

 

यावेळी कृषी पर्यवेक्षक मंजुनाथ, ज्ञानविकास समन्वयाधिकारी गंगाबाई जगताप, सहायक प्रबंधक निंगराज, औद्योगिक विस्तार अधिकारी श्वेता होसमनी, जिल्हा संचालक प्रदीप शेट्टी, तालुका योजनाधिकारी मंजुनाथ एन आर, तांत्रिक प्रबंधक गीता, पर्यवेक्षक उमेश, सेवाप्रतिनिधी विनोद, भारती, सुलेखा, तंजुमलक्ष्मी ज्ञानविकास सदस्य उपस्थित होते.

Tags: