किच्च सुदीप अभिनित ‘विक्रांत रोण’ चित्रपटाला बेळगावातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. किच्च सुदीप चाहत्यांनी भव्य बाईक रॅली काढून चित्रपट गृहासमोर गर्दी करत मोठ्या उत्साहात चित्रपट पहिला.
अभिनय चक्रवर्ती अशी ख्याती असलेल्या किच्च सुदीप यांचा बहुप्रतीक्षित विक्रांत रोण हा चित्रपट गुरुवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. बेळगावमधील चन्नम्मा चौक पासून चित्र थिएटरपर्यंत चाहत्यांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या बाईक रॅलीत किच्च सुदीप सेना समितीचे शंकरांना यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने चाहत्यांनी सहभाग घेतला होता.
बेळगावमधील ३ चित्रपट गृहात विक्रांत रोण हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्र, आयनॉक्स आणि स्वरूप नर्तकी या चित्रपट गृहात याचे खेळ सुरु आहेत. चित्र आयनॉक्स मध्ये सकाळी ८.३० तर स्वरूप नर्तकीमध्ये १२.३० चा पहिला खेळ प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात किच्च सुदीप यांचा अभिनय पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दीही केली होती. दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांचे चित्र असलेले टी-शर्ट परिधान करून चाहते हजर होते. यावेळी सुदीप यांच्या कटआउट्ला चाहत्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिमान व्यक्त केलाय.
सदर चित्रपट हिंदी भाषेत देखील उपलब्ध असून 3डी आणि 2 डी मध्ये उपलब्ध आहे. चित्रपटातील सुदीप यांच्या एंट्रीनंतर प्रेक्षकांनी जोरजोरात घोषणा देत केक देखील कापला. शिवाय सुदीप यांच्या नावाने जयजयकारही केला.
यावेळी आमच्या वाहिनीला प्रतिक्रिया देताना सुदीप चाहत्यांनी सांगितले कि, हा चित्रपट पाहण्यासाठी आपण खूप दूरवरून आलो आहोत. सुदीप यांचा चित्रपट म्हणजे आमच्यासाठी उत्सवाप्रमाणे असतो. प्रत्येकाने हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊनच पहावा असे आवाहनदेखील चाहत्यांनी केले. () + ()
बेळगावमध्ये ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ दरम्यान सुदीप चाहत्यांनी आपले प्रेम व्यक्त करत चित्रपटाचा पहिला खेळ धुमधडाक्यात पाहिला.


Recent Comments