कॅम्प स्टेशनचे पोलीस योग्य वेळी पोहोचल्याने एक संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची घटना आज बेळगावात घडली.
होय, बेळगावमधील क्लब रोडवर गेल्या चार दिवसांपासून काही मद्यपी लोकांना त्रास देत होते. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. याबाबत जनतेच्या अनेक तक्रारी होत्या. बुधवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत या मद्यपींनी गोंधळ घालून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला.
आज गुरुवारीही पुन्हा असाच गोंधळ घालत हे मद्यपी थांबले होते. याची माहिती मिळताच कॅम्प पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मद्यपींना ताब्यात घेतले. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.


Recent Comments