खडेबाजार, बेळगाव येथे दरवर्षी प्रमाणे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा संजीवनी समाधी उत्सव साजरा करण्यात आला.
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी उत्सवानिमित्त शनिवार 23 जुलै 2022 ते मंगळवार 26 जुलै 2022 या कालावधीत खडेबाजार-बेळगाव येथील संत नामदेव मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रोज सकाळी ६ ते ७ या वेळेत काकडारती करण्यात आली. त्यानंतर श्री गणेश पूजा करण्यात आली. पोथीची प्रतिष्ठापना, नामदेव महिला मंडळातर्फे माध्यान्ह भजनाचा कार्यक्रम, इयत्ता १ ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायंकाळची वेशभूषा स्पर्धा आणि इयत्ता ५ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली.


Recent Comments