Chikkodi

खास. अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मोफत रुग्णवाहिका

Share

चिकोडी तालुक्यातील एकसंबा परिसरातील सामुदायिक आरोग्य केंद्रात खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून २०१९-२० सालच्या स्थानिक क्षेत्र विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या १६.५० लाख रुपयांच्या खर्चातून जनतेच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका सुरु करण्यात आली असून बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांच्याहस्ते या रुग्णवाहिकेला चालना देण्यात आली.

बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यावेळी बोलताना म्हणाले, चिकोडी येथील खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून १० प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सामुदायिक आरोग्य केंद्रांसाठी खासदार निधीतून १ कोटी ६८ लाख रुपयांच्या खर्चातून १० रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या आहेत. एकसंबा शहरातील जनतेला वेळेवर आणि उत्तम आरोग्य सेवा मिळावी, लोकहिताचे रक्षण व्हावे या उद्देशाने खासदार निधीतून हि मोफत रुग्णवाहिका सुरु करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. यावेळी बिरेश्वर संस्थेचे अध्यक्ष जयानंद जाधव, संचालक अप्पासाब जोल्ले, ज्योती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत खोत, वैद्याधिकारी एस पी बागेवाडी, रजनीकांत पांगम, मताब माकानदार, राजू मगदूम, राजू बाकळे, रामचंद्र बाकळे, शंकर बाकळे सुभाष कट्टीकर आदी उपस्थित होते.

Tags: