Kagawad

उगार येथे १ ऑगस्ट रोजी संत बसवेश्वर पुतळा अनावरण

Share

ककर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथे सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी विजापूर ज्ञान योगाश्रमचे प पु श्री सिद्धेश्वर स्वामींच्या हस्ते जगज्योती बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

२० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जगज्योती श्री बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उगारा खुर्द शहर बसव समितीचे अध्यक्ष डॉ.सिद्धगौड कागे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. या सोहळ्यास श्री सिद्धेश्वर स्वामीजी, श्री बसवलिंग स्वामीजी, उगार खुर्द, श्री बसवेश्वर महास्वामीजी कृष्णकित्तूर, ज्ञानयोगाश्रमाचे श्री हर्षानंद स्वामीजी हुल्याळमठ आदींची उपस्थिती असेल.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसव समितीचे अध्यक्ष डॉ. सिद्धागौड कागे हे असणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून साखर उद्योजक राजाभाऊ शिरगावकर, माजी आमदार राजू कागे, मिरज येथील प्रसिद्ध रोगतज्ञ डॉ. सोमशेखर पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माही संघटकांनी दिली आहे.

बसव समितीच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजाकडून देणगी घेऊन २० लाख रुपयांच्या खर्चातून या पुतळ्याची निर्मिती केली आहे. २००४ मध्ये मिरज येथील शिल्पकार गुज्जर यांनी हि मूर्ती बनविली आहे. रस्ता रुंदीकरण सुरु असल्याने पुतळा अनावरण करण्यात आले नव्हते. मात्र आता १ ऑगस्ट रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सिद्धगौड कागे यांनी दिली.

यावेळी समाजातील नेते आणि समाजबांधव उपस्थित होते.

Tags: