Crime

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी-मुलावर हल्ला; मुलाचा मृत्यू

Share

पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा आणि 4 वर्षाच्या मुलावर खुनी हल्ला केल्याची भयंकर घटना गोकाकत तालुक्यात घडली. या घटनेत 4 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन पतीने पत्नी आणि चार वर्षांच्या मुलाचा गळा चिरला. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील शिल्टीभावी गावाच्या हद्दीतील उसाच्या शेतात ही घटना घडली. या घटनेत शिल्टीबावी गावातील बाळेश अक्कानी या ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. मुलाची आई 27 वर्षीय लक्ष्मी मुत्तेप्पा अक्कानी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुत्तेप्पा अक्कानी या २८ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पत्नीचे अनैतिक संबंध हे खुनाचे कारण असल्याचे सांगण्यात येत असले तरी हत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. गोकाक डीवायएसपी मनोजकुमार, गोकाक ग्रामीण सीपीआय यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी गोकाक पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Tags: