महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस बेळगाव शिवसेनेच्या वतीने मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस बेळगाव येथील टिळक चौकात स्थानिक ज्येष्ठ नागरिक महादेव यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. त्यानंतर त्यांनी जमलेल्या जनतेला मिठाई वाटून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बेळगावचे शिवसेना नेते बंडू केरवाडकर म्हणाले की, आम्ही बेळगावची जनता बाळासाहेब ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी दीर्घकाळ उभी आहे. यापुढेही आम्ही त्यांच्यासोबत राहू. उद्धव यांचा वाढदिवस आम्ही खूप आनंदात साजरा करत आहोत. भविष्यातही असेच समाजोपयोगी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दत्ता जाधव म्हणाले की, आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हजारो लोक बेळगावहून मुंबईला जाऊन त्यांना शुभेच्छा देत असत. पण यंदा ते शक्य झाले नाही. म्हणून आम्ही त्यांचा वाढदिवस आज बेळगावात साजरा करत आहोत. उद्धव ठाकरे यांची फसवणूक करणार्यांचे कधीच भले होणार नाही असे त्यांनी सांगितले.
राजू तुडयेकर, दिलीप बैलूरकर, प्रवीण तेजम, तानाजी पावशे, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, रवींद्र जाधव, विजय मुरकुटे, बाळासाहेब डांगरले, प्रदीप सुतार, भाऊसाहेब किल्लेकर, सतीश जुटेकर, दिलीप नाईक ज्ञानेश्वर मण्णूरकर, प्रकाश भोसले, विठ्ठल उंदरे, संजय चतुर, शेखर शेट्टी, संजय देसाई, विनायक कोवाडकर, भरमा सावगावकर आदींसह शिवसेना नेते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Recent Comments