Vijayapura

एटीएम फोडणाऱ्या चोरट्याला रंगेहाथ पडून ठोकल्या बेड्या

Share

येथील एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एकाला नाईट ड्युटीवरील पोलिसांनी बेड्या ठोकल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील तिकोट शहरातील बसवेश्वर चौकातील इंडिया वन एटीएममध्ये घडली. 

मल्लिकार्जुन माळी नामक चोरट्याने तिकोट शहरातील बसवेश्वर चौकातील इंडिया वन एटीएममध्ये प्रवेश करून पैसे लूटण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यावेळी रात्रीची गस्त घालणारे पोलीस सुनिल पोटा आणि साबू कांबळे यांनी त्याला रंगेहाथ पकडले.

डोक्यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून आणि हातात लोखंडी रॉड घेऊन माळीने एटीएममध्ये घुसून एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. सेफ लॉकर आणि पासवर्ड की बोर्डचे नुकसान केले. तोवर एटीएमकडे पोहोचलेल्या पोलिसांनी मल्लिकार्जुन माळीला पोलिसांचा पाहुणा बनवले. ही घटना तिकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: