कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सीमाभागातील 865 गावातील विध्यार्थ्यांना मोफत आणि सवलतीच्या दरात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येत आहे. सीमाभागातील होतकरू विध्यार्थ्यानी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. भारती पाटील यांनी केले.
यावेळी शिबिराला संबोधित करताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले की, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. याचा विचार विद्यार्थ्यांनी करायला हवा. तुमच्यासाठी योग्य असलेले अभ्यासाचे क्षेत्र निवडा. याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन पुढे येण्यास सांगितले. 
Belagavi
सीमाभागातील विध्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठातर्फे मोफत अभ्यासक्रम


Recent Comments