हुक्केरी शहरात मनपाने प्लास्टिक बंदी मोहिमे अंतर्गत केलेल्या कारवाईत हुक्केरी शहरातील हनुमान किराणा दुकानातील लाखो रुपयांचे प्लास्टिक जप्त केले आहे.

कमी मायक्रॉन असलेल्या प्लास्टिकवर शासनाने बंदी घातली असून या पार्श्वभूमीवर हुक्केरी नगरपालिकेने शहरातील दुकानदारांना प्लास्टिक न वापरण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र काही दुकानदार या सूचनेचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले असून मिळालेल्या माहितीनुसार हुक्केरी नगरपालिका मुख्याधिकारी मोहन जाधव यांनी सदर कारवाई हाती घेतली.
या अंतर्गत आज प्लास्टिक बंदी मोहीम हाती घेऊन हनुमान किराणा दुकानातील गोदामात साठविण्यात आलेले लाखो रुपये किमतीचे प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.यासंदर्भात मोहन जाधव यांनी प्रतिक्रिया दिली असून सरकारी आदेशाचे पालन न करणाऱ्या शहरातील दुकानदारांवर सदर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेत मोहन जाधव यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस अधिकारी देखील सहभागी झाले होते . 


Recent Comments