दावणगेरे येथे ३ ऑगस्ट रोजी सिध्दरामय्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कागवाड मधील एका युवकाने पदयात्रा सुरु केली आहे. सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत, अशी या युवकाची इच्छा आहे. कागवाड मधून बेळगावमध्ये आलेल्या सिद्धरामय्या चाहत्यांचे आज बेळगावमधील सिद्धरामय्या चाहत्यांनी स्वागत केले आहे.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दवणगेरे येथे आयोजिण्यात आलेल्या सिद्धरामोत्सव कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी कागवाड तालुक्यातील मोळे या गावातील संतोष विठोबा चोरमले या व्यक्तीने आज पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी बेळगावमध्ये दाखल झाला आहे. या चाहत्यांचे स्वागत आज बेळगावमधील सिद्धरामय्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात केले आहे. या कार्यक्रमात १० लाख समर्थकांसह काँग्रेसचे पदाधिकारीही सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.
आपल्या पदयात्रेसंदर्भात बोलताना संतोष विठोबा चोरमले म्हणाले, आपण सिद्धरामय्या यांचे मोठे समर्थक आहोत. जेथे साहेब असतील तिथे मी हजर असेन.. सिध्दरामय्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे अशी माझी इच्छा आहे. सिध्दरामय्यांमुळे आज अनेकांना तांदूळ उपलब्ध होत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आपण पदयात्रेचा निर्धार केला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी जि पं सदस्य रमेश किवूटगी यांनी संतोष विठोबा चोरमले यांच्या पदयात्रेसंदर्भात माहिती दिली. संतोष विठोबा चोरमले यांच्या पदयात्रेला शुभेच्छा देत त्यांनी बेळगावमधील काँग्रेस कार्यकर्ते आणि सिद्धरामय्या समर्थकांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी सोमशेखर हिट्टनगी, बसवराज शेगावी, वकील आर पी पाटील, गेंजी, विजय हुनश्याळ, बसवराज मागोती, वेन्कन्ना हिट्टनगी, बसवराज हिट्टनगी, रमेश उटगी आदी उपस्थित होते.


Recent Comments