Athani

शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांची तपासणी

Share

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही नियम घालून देण्यात आले आहेत. मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि इतर वाहनांमुळे यापूर्वी धोका निर्माण झाल्याच्या अनेक घटना आपण पहिल्या असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. यामुळे मर्यादेपेक्षा अधिक मुलांची वाहतूक शाळकरी वाहनातून करू नये, अशी कडक सूचना अथणी पीएसआय कुमार हाडकर यांनी दिली.कुमार हाडकर यांच्या नेतृत्वाखाली आज अथणी परिसरातील शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. ज्या वाहनातून ४ ते ५ आसनाची व्यवस्था असते अशा वाहनातून १५ हुन अधिक विद्यार्थ्यांना बसविले जाते. ज्याठिकाणी चालकाच्या आसनाची व्यवस्था असते त्याठिकाणीही ३ ते ४ मुलांना बसविण्यात येते. या मुलांसोबत दफ्तराचेदेखील अधिक ओझे असते.या साऱ्या गोष्टींचा विचार करता विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे वाहन चालकांनी मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रिक्षा अथवा इतर शाळकरी वाहनात बसवू नये, असा सूचना पीएसआय कुमार हाडकर यांनी दिल्या आहेत. केवळ रिक्षा चालकच नाही तर पालकांनी देखील या गोष्टीची खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Tags: