बैलहोंगल मधील जवळीखुट येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा यात्रा महोत्सव भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला.

संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७२ व्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी बैलहोंगलच्या जवळीखुट मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात यात्रमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . या निम्मित विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या आळंदीहून आलेल्या भावभक्ती वारकरी शिक्षण संस्थेच्या भजनी मंडळाने यावेळी भजन सादरीकरण केले. या वेळी काढलेल्या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गोम्बीगुडी, कोप्पद गल्ली, श्री मारुती मंदिर, क्रांतिवीर संगोळी रायन्ना चौक मार्गाने सदर दिंडी मंदिराकडे पोहोचली.
या वेळी नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष आण्णाप्पा जूंजाळे, मित्रमंडळाचे अध्यक्ष सुवास बोन्गाळे व इतर सहभागी झाले होते .


Recent Comments