Belagavi

आर एल लॉ कॉलेजमध्ये अंमली पदार्थांसंदर्भात कार्यशाळा

Share

बेळगाव शहर पोलीस आणि आर एल लॉ कॉलेज यांच्या सहयोगाने अंमली पदार्थांसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.अंमली पदार्थांचा वापर, तस्करी आणि विक्री यासंदर्भातील कायदे आणि तपास प्रक्रियेबद्दल सदर कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले.

पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, यांच्याहस्ते कार्यशाळेचे उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी एनडीपीएस कायद्याचे महत्त्व आणि व्यसनाचे परिणाम समजावून सांगितले.या कार्यशाळेत कायदा आणि सुव्यवस्था विभागासह शहरातील सर्व एसीपी, पीआय, तपास कर्मचारी तसेच आर एल लॉ महाविद्यालयाचे चेअरमन, प्राचार्य आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

व्याख्याते श्री वाफ आणि निवृत्त पीपी श्री पारशेट्टी यांनी एनडीपीएस तपास कौशल्यासंदर्भात व्याख्यान दिले.

Tags: