Vijayapura

२३ वर्षांनंतरही अंगावर शहारे आणणारी ‘ऑपरेशन विजय’ची कहाणी

Share

१९९९ साली ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत झालेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविला. या युद्धात पाकिस्तानची स्वप्ने धुळीला मिळाली परंतु यासाठी भारतमातेच्या ५२७ सुपुत्रांना वीरमरण पत्करावं लागला. २३ वर्षानंतरदेखील या युद्धाचे प्रसंग आठवले कि अंगावर शहारे उभे राहतात. या युद्धात सहभागी झालेल्या अनेक वीरयोध्यांना आजही पाकिस्तानला धडा शिकविलेल्या गोष्टीवर अभिमान आहे.. या वीरगाथेचा अनुभव आमच्या आपली मराठी वाहिनीला एका योध्याने सांगितलं आहे.. पाहुयात याचसंदर्भातील हा खास रिपोर्ट

१९९९ साली पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण, दि. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येकवर्षी २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. अतिरेक्यांना आश्रय देणारा देश म्हणून जगासमोर ओळखला जाणाऱ्या पाकिस्तान ने ऑपरेशन ‘बदर’च्या नावाखाली भारत-पाकिस्तानमधील सीमा नियमांचे उल्लंघन करून भारताच्या पवित्र भूमीत घुसखोरी केली, तेव्हा भारतीय लष्करानेही ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत सडेतोड प्रत्युत्तर दिले. निरंतर ६५ दिवस सुरु असलेल्या या युद्धाची परिस्थिती विजापूर येथील विंग कॅप्टन नारायण सूर्यवंशी या योध्याने कथन केली आहे. १९९९ मध्ये ऑपरेशन विजयसाठी १० बटालियन सैन्य तैनात करण्यात आले होते. नागा रेजिमेंट, गुरखा, ग्रीन वे, जैन के सिक रेजिमेंटसह १० बटालियनने पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले आणि तोपर्यंत पाकिस्तानने ताब्यात घेतलेले सीमावर्ती भाग पुन्हा ताब्यात घेतले. भारतीय लष्कराचा हा पहिला विजय असल्याचे कॅप्टन नारायण सूर्यवंशी सांगतात. भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या हजारो सैनिकांचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी सलग ६५ दिवस रात्रंदिवस एकत्र लढा दिला. अंगावर शहारे उभे करणाऱ्या या कारगिल युध्याची अधिक माहिती जाणून घेऊयात नारायण सूर्यवंशी यांच्याच शब्दात भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबार आणि टँकर हल्ल्यात पाकिस्तानचे हजारो सैनिक मारले गेले. युद्ध लढण्याची परिस्थिती नसल्याने पाकिस्तानला परभाव पत्करावा लागला. या युद्धात भारतमातेच्या ५२७ जवानांना वीरमरण आले. त्या सर्व सैनिकांच्या स्मरणार्थ तत्कालीन केंद्र सरकारने २६ जुलै हा कारगिल दिवस घोषित केला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी, शहिदांच्या कुटुंबाला स्वाभिमान वाटावा यासाठी हा विजयोत्सव दिन साजरा करण्यात येतो. ()

लडाखमध्ये ६५ दिवस पाकिस्तानी सैन्यासोबत सुरु असलेल्या युद्धात अखेर भारताने विजय मिळविला. दरवर्षी आजच्या दिवशी आपण पाकिस्तानद्वारे सुरु असलेल्या युद्धा शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. भारतीय सशस्त्र दलाच्या योगदानाच्या स्मरणार्थ कारगिल योध्यांना इन न्यूजचाही सलाम!

विजयकुमार सारवाड, इन न्यूज नेटवर्क, विजापूर

Tags: