बेळगाव शहरातील सदाशिव नगर येथील मरगाई मंदिरात मरगाई देवी यात्रा महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव शहरातील सदाशिव नगर येथील मरगाई देवी मंदिरात मार्गाने देवी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा महोत्सवानिमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असंख्य भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे दिसून आले. यात्रा महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध दुकाने थाटण्यात आली होती.
या यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या भक्तांनी आपली मराठीला प्रतिक्रिया दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही हि यात्रा आयोजित करण्यात आली असून याठिकाणी ५ देवतांचा उत्सव साजरा होतो. गेल्या २ वर्षात कोविड मुळे हि यात्रा आयोजित करण्यात आली नाही मात्र यंदा मोठ्या उत्साहात आणि भव्य प्रमाणात हि यात्रा आयोजित करण्यात आली असल्याचे भक्तांनी सांगितले. या यात्रा महोत्सवात असंख्य भाविकांनी मरगाई देवीचे दर्शन घेतले.


Recent Comments