Athani

धक्कादायक: अथणी येथे कालव्यात आढळला मृतदेह

Share

अथणी येथील पाटबंधारे कालव्यात संशयास्पदरित्या एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी या तालुक्यातील यक्कंची या गावातील पाटबंधारे योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामकाजातील कालव्यात एका युवकाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे.सदर बाब लक्षात येताच ऎगळी पोलीस स्थानकात ग्रामस्थांनी माहिती दिली असून तातडीने बचावकार्य पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मात्र मृतदेहाची ओळख पातळी नाही. मृतदेहावरील काही वस्तूदेखील पोलिसांच्या हाती लागल्या असून या वस्तूंवरून मृतदेहाची ओळख पटल्यास तातडीने ऎगळी किंवा अथणी पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन बचावकार्य पथकाने केले.

ज्यापद्धतीने हा मृतदेह आढळून आला आहे, यावरून खुनाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. साक्षी पुरावे नष्ट करण्यासाठी हा मृतदेह या कालव्यात फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर घटना ऎगळी पोलीस स्थानकात दाखल झाली आहे.

Tags: