मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेली रस्सीखेच यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मंत्री उमेश कत्ती यांनी आपणदेखील मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहत असल्याचे सांगितले. नशिबात असेल तर आपणही मुख्यमंत्री होऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. आपण आता ६० वर्षांचे आहोत. १५ वर्षे आपण आमदार म्हणून कार्यरत आहोत. भाजपच्या नियमानुसार अजून बराच वेळ आहे. काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे. डीकेशी आणि सिद्धरामय्या यांच्यात सुरु असलेली अंतर्गत रस्सीखेच याबाबत आपल्याला काही माहित नाही परंतु मुख्यमंत्री होण्यासाठी सर्वप्रथम त्यांचा पक्ष सत्तेवर येणे गरजेचे आहे असा टोला त्यांनी लगावलाय.
जमीर यांना हायकमांडकडून इशारा देण्यात आला आहे. काँग्रेसची परिस्थिती सध्या योग्य नसून पुन्हा भाजप सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास देखील उमेश कत्ती यांनी व्यक्त केलाय. काँग्रेसमध्ये फूट पडून काँग्रेसचे तुकडे होतील आणि भाजप बहुमताने पुन्हा सत्तेवर येईल, उत्तर कर्नाटकाच्या विकासाबद्दल अनेक मागण्या होत आहेत मान्य आहे. गेल्या २० वर्षांपासून उत्तर कर्नाटकाच्या विकासाबद्दल मागण्या होत असल्याचे उमेश कत्ती म्हणाले.
या भागाच्या विकासासाठी आपणदेखील परमाणिक प्रयत्न करणार असून विकासाच्या दृष्टिकोनातून उत्तर कर्नाटक अन्याय झाल्याचे ते म्हणाले. हे असेच सुरु राहिल्यास उत्तर कर्नाटकाच्या विभाजनाची मागणीही पुढे येईल, विकासाच्या दृष्टीकोनातून उत्तर कर्नाटकावर अन्याय होता कामा नये, अन्याय झाला तर आपणही उत्तर कर्नाटकासाठी पुढाकार घेईन, असे उमेश कत्ती म्हणाले.


Recent Comments