वडगावची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री मंगाई देवीचा यात्रोत्सव कोविड परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा ३ वर्षांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलाय. सवाद्य मिरवणूक, गाऱ्हाणे, मंगाई देवस्थान कमिटीच्यावतीने मंदिराला करण्यात आलेली आकर्षक आरास आणि सजावट, कोंबडीची पिल्ले उडविण्याची प्रथा यासह भाविकांचा अपूर्व उत्साह अशा वातावरणात मंगाई यात्रेला सुरुवात झाली.
वडगावची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री मंगाई देवीचा यात्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज पार पडला. गेल्या महिन्याभरापासून घालण्यात आलेले गाऱ्हाणे उतरविण्याच्या विधीनंतर हक्कदार, वतनदार यांच्यातर्फे पूजन करण्यात आले आणि यात्रोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी महिलांनी देवीची ओटी भरून नवस फेडला. या यात्रेत उत्तम पीक पाण्यासाठी देवीला नवस केला जातो, अशी या देवस्थानाची प्रथा आहे. नवसपूर्तीसाठी या देवस्थानावर कोंबडीची पिल्ले उडविण्याची प्रथा असून यावेळी नवसपूर्तीसाठी कोंबडीची पिल्लंही उडविल्याचं पाहायला मिळालं.
हजारो भाविकांची उपस्थिती असणाऱ्या या यात्रोत्सवात भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाने उत्तम सोय केली होती. तसेच खबरदारीसाठी वारंवार ध्वनिक्षेपकावरून सूचनाही करण्यात येत होत्या. दर्शनासाठी भाविकांनी लांबच्या लांब रांगा लावल्याचाही यावेळी पाहायला मिळालं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर कमिटीसह पोलीस विभागानेही खबरदारी घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता. यात्रा परिसरात रुग्णालयाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
शहापूर पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या या यात्रोत्सवासाठी पोलीस विभागानेही चोख बंदोबस्त ठेवला होता. हजारो भाविकांची उपस्थिती असणाऱ्या या यात्रोत्सवासाठी केएसआरपी जवानांची तुकडीही तैनात करण्यात आली होती. याशिवाय यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून वारंवार भाविकांना सूचनाही करण्यात येत होत्या.
केवळ कर्नाटकच नाही तर महाराष्ट्र आणि गोव्यातून देखील याठिकाणी भाविकांची उपस्थिती असते. गेल्या ३ वर्षांपासून साध्या आणि छोट्या प्रमाणात हि यात्रा भरत होती. मात्र यंदा भव्य प्रमाणात हि यात्रा साजरी केली जात असून अनेक भाविकांनी या यात्रेला उपस्थिती दर्शविली. येथील देवीला केलेला नवस हा पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा असून मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या या यात्रेत सहभागी होण्यासाठी शिवमोगाहून आलेल्या एका भाविक महिलेने आपली मराठीशी संवाद साधला.
विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांनी यात्रा परिसर खुलला होता. यात्रा परिसरात पूजा साहित्य आणि खेळण्याची दुकाने तसेच विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ देखील याठिकाणी उपलब्ध होते. ३ वर्षात हि यात्रा भरली नसल्यामुळे यंदाची हि यात्रा भाविकांच्या अपूर्व उत्साहात आणि हजारोंच्या उपस्थितीत पार पडली.


Recent Comments