Belagavi

मनपा अधिकाऱ्यांना आली जाग! आरपीडी क्रॉस जवळ ड्रेनेज पाइपलाइनचे काम सुरु

Share

बेळगाव शहरात विकासाच्या नावाने बोंब आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली बेळगाव परिसर भकास झाला असून अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे रेंगाळली आहेत. तर काही ठिकाणी स्मार्ट सिटीच्या कामकाजामुळे नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. आरपीडी क्रॉस हा देखील यापैकीच एक असून या भागात ड्रेनेज पाइपलाइनला लागलेल्या गळतीसंदर्भात आलेल्या तक्रारीनंतर मनपा अधिकाऱ्यांना जाग आली आहे.

मूलभूत आणि पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शहरात सुरु असलेल्या विकासकामांवर नागरिक ताशेरे ओढत आहे. शहरातील आरपीडी क्रॉस येथील ड्रेनेज पाईप लाईनला लागलेल्या गळतीमुळे अनेकवेळा नागरिकांनी तक्रार देऊनही दुर्लक्ष करण्यात आले होते. सातत्याने होत असलेल्या टीकांमुळे बेळगाव मनपा अधिकाऱ्यांना जाग आली असून अखेर आरपीडी क्रॉस येथील ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

गेल्या १५ दिवसांपासून हि समस्या उद्भवली होती. गळती लागलेल्या ड्रेनेज पाइपलाइनमुळे दूषित पाणी रस्त्यावर वाहात होते. आधीच पावसाळा त्यात हि भर यामुळे नागरिक हैराण झाले होते. यासंदर्भात आपली मराठी वृत्तवाहिनीवर वृत्त प्रसारित देखील करण्यात आले होते. वृत्त प्रसारित होताच अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन मंगळवारी दुरुस्तीच्या कामकाजाला सुरुवात केली आहे., त्यामुळे नागरीकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: