बैलहोंगर परिसरातील गणचारी शिक्षण संस्थेत मंगळवारी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून वकील एफ एस सिद्दानगौडर हे उपस्थित होते. यावेळी बोलताना सिद्देनगौडर म्हणाले, कारगिल युद्धात विजय मिळवून देणाऱ्या सैनिकांचे स्मरण प्रत्येक भारतीयाने केले पाहिजे. कारगिल युद्धात पाकिस्तान विरोधातील युद्धात भारताचे ५२७ जवान शहीद झाले. या प्रत्येक जवानांचे बलिदान आपण स्मरण केले पाहिजे असे ते म्हणाले. ()
या कार्यक्रमाचे उद्घाटन कारगिल युद्धातील सैनिक गंगाप्पा गुग्गरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी कारगिल युध्याच्या आठवणींना उजाळा दिला. बंकरमधील सैनिकांवर झडलेल्या फैरी, युद्धभूमीवरील ते प्रसंग त्यांनी उपस्थितांना सांगून कारगिलच्या आठवणी ताज्या केल्या. ()
माजी सैनिक नागाप्पा गुंडलूर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. भारत सरकारच्या अग्निपथ योजनेबद्दल त्यांनी माहिती देत हि योजना देश आणि युवकांसाठी महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. अग्निपथसंदर्भात सुरु असलेल्या कोणत्याही अफवांना बळी न पडता युवकांनी या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ()
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक श्रीकांत मेळ्य्यानावर , संस्थेचे प्राचार्य डॉ. सी. बी. ग्णाचारी हे होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सैन्यदलातील संजीव हांचीनमानी, सचिन कलघटगी, डॉ. रमेश शिंदे, सिद्दप्पा खनगार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अप्पांना संगोळी, मंजुळा हुदली, मल्लिकार्जुन कुरी, सोमशेखर वन्नुर, संतोष गाणींगेर आदींसह इतर मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. मल्लिकार्जुन वककुंद यांनी स्वागत केले तर सिद्धारूढ होंडाप्पाणावर यांनी आभार मानले.


Recent Comments