फॉलिक ऍसिडची मात्रा असलेल्या गोळ्या खाल्ल्याने ५५ विद्यार्थी आजारी पडल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील बसिडोनी येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत घडली आहे.

बिसिडोनि येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी दुपारी २३९ विद्यार्थ्यांनी माध्यान्ह आहार घेतला. जेवणानंतर प्रत्येक सोमवारी फॉलिक ऍसिडचे प्रमाण असलेली गोळी देण्यात येते. यानुसार प्रत्येकाला सदर औषध देण्यात आले. मात्र या औषधामुळे सायंकाळी ७.३० च्या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांना पोट दुखीचा त्रास जाणवू लागल्याचे निदर्शनास आले. यातील २१ विद्यार्थ्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यासंदर्भात तालुका आरोग्याधिकारी डॉ. महेश चित्तरगी यांनी रुग्णालयाला भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना सलाईन लावली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मुलांना दुपारच्या जेवणानंतर किंवा फॉलिक ऍसिडची मात्रा घेतल्यानंतर हा प्रकार घडला याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झाली नाही.
सदर मुलांवर रात्रभर लक्ष ठेवण्यात येणार असून काही मुलांच्या तब्येतीत सुधारणाही झाली आहे. घाबरण्याची कोणतीही गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. आजारी मुलांमध्ये इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा समावेश आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.


Recent Comments