खासबाग येथील देवांग विद्यावर्धक संघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दहावी परीक्षेत ६० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. खासबाग येथील श्री बनशंकरी मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. चेअरमन नारायण कुलगोड, शंकर राजेंद्र हंची तसेच इतर मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांनी सुशिक्षित बनावे, पालकांनी मुलांना सहकार्य करावे, तसेच मुलांनी पालकांच्या उतारवयात आपली जबाबदारी ओळखून त्यांना मदत करावी, चांगले संस्कार उत्तम समाज निर्माण करू शकतो असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments