Belagavi

संगनकेरीत तरुणांनी तलवारीने कापला वाढदिवसाचा केक !

Share

बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील संगनकेरी गावात दोन तरुणांनी तलवारीने केक कापून जाहीररीत्या वाढदिवस साजरा केल्याची घटना घडली.

ही घटना 23 जुलै रोजी घडली असून, काहीशी उशिरा उघडकीस आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील संगनकेरी गावात मल्लिक नदाफ आणि अशोक गाडीवड्डर या दोन तरुणांचा वाढदिवस होता. या वेळी या तरुणांनी तलवारीचा केक कापून आपला वाढदिवस जाहीरपणे साजरा केला.

 

त्यांनी तलवारीने केक कापून आणि फटाके फोडून सार्वजनिकरित्या आनंद साजरा केला. तलवारीने केक कापल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटप्रभा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

Tags: