Belagavi

पिरनवाडीतील बिरदेव मंदिरात पारंपरिक हिरवाईचा सण !

Share

बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी गावातील हालुमत कुरबर (धनगर) समाजाच्यावतीने समाजाचे अत्यंत जागृत आणि आराध्य दैवत श्री बिरदेव मंदिराच्या आवारात हिरवाईचा सण रविवारी सायंकाळी  भक्तांच्या उपस्थितीत पारंपारिक विधींसह पुजा करुन साजरा करण्यात आला.

प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या या कार्यक्रमाला सुमारे साठहुन अधिक वर्षांची परंपरा व इतिहास आहे. यानिमित्त देवाला अभिषेक, ढोल वादन, धनगरी गाणी, मंदिरा भोवती पालखी उत्सव, नारळ वाढवण्यासह, भाविकांकडुन अंबिल, घुगऱ्या व पोळ्यांचा गोड नैवेद्य देवाला अर्पण करण्यात आले. त्यानंतर प्रसाद वाटपासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. त्यानंतर वैयक्तीक स्नेह भोजनाचा कार्यक्रमही होता.

दरम्यान, एका भक्ताने या पारंपरिक सणाविषयी अधिक माहिती दिली.

 

या प्रसंगी समाजाचे देवर्षि श्री राजु पुजारी, श्री बिरदेव मंदिर पंच कमिटीचे पदाधिकारी, धनगर समाजातील जेष्ठ महिला व पुरुष, युवक, युवती व बाळगोपाळ कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.

हिरवाईच्या या सणानिमित्त मंदिर व परिसराची स्वच्छता व सजावट करून देवाला अभिषेक घालण्यात आला. फुले, हार व दिपालंकारानी देवाला सजवून देवाची आरास करण्यात आली होती.

Tags: