Vijayapura

विजापुरात जोरापूर पेठेतील अंबाभवानी मंदिराचा दशकपूर्ती सोहळा

Share

ते एक अदभूत जागृत देवस्थान ! त्या मंदिरात राहणारी देवी ही सर्व शक्तिरूपिणी आहे. अशा प्रकारे त्या देवीचे दर्शन घेण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविक येतात. जागृत देवी असलेल्या या मंदिराचा सध्या दहावा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन समितीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत सादर आहे एक विशेष वृत्तांत…  

होय, घुमट नगरी विजापुरात जोरापूर पेठेतील श्री अंबा भवानी मंदिराचा दशकपूर्ती सोहळा सध्या साजरा करण्यात येत आहे. मंदिर व्यवस्थापन समितीने यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री अंबाभवानी मंदिर विद्युत रोषणाईने आणि फुलांनी सजवण्यात आलंय. श्रीशक्ती तरुण संघातर्फे नाडदेवीची चांदीची मूर्ती बसवण्यात आली.१९७६ पासून येथे नवरात्रीला नाडदेवी भुवनेश्वरीची अभिषेक व पूजा केली जाते. मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त होम हवन व इतर कार्यक्रम होणार आहेत. मंदिरात धार्मिक विधी पार पडले. आजही पहाटे सहा वाजता पूजेला सुरुवात झाली. होम हवनानंतर पूजा करण्यात आली. याबाबत मंदिर समितीच्या सदस्यांनी माहिती दिली.

गेल्या दोन वर्षांपासून मंदिराचा वर्धापनदिन आणि नवरात्र उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने साजरे करण्यात आले. मात्र, यावेळी वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला. मंदिरात पालखी उत्सव आणि दुपारी अन्नप्रसाद झाला. पालखी उत्सव जोरापूर पेठेतून फिरून मंदिरात परत येते. पालखी उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात. त्यानंतर देवीला विविध पदार्थांचा नैवेध्य अर्पण करण्यात येतो.

 

एकंदर, विजापुरातील जोरापूर पेठेत जगन्माता तुळजाभवानी पूजनाचा सोहळा भक्तिभावाने सुरू आहे. भक्तांची मने समृद्ध होत आहेत. जय जगदंबे, जय भवानी असा गजर होत आहे. मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्यात असंख्य भाविक श्रद्धेने सहभागी होत आहेत.

Tags: