रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती गावात विजेचा स्पर्श होऊन एका म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील सोसायटीच्या आवाराजवळ असलेल्या टीसीचा म्हशीला स्पर्श होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.

ही म्हैस शेतकरी विठ्ठल माने यांची होती. अत्यंत गरिब असलेल्या या शेतकऱ्याच्या म्हशीचा मृत्यू झाल्याने त्यांचे माथे आर्थिक नुकसान झाले आहे.
हेस्कॉमचे अधिकारी एम. डी. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून संबंधित वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले. स्थानिकांच्या मदतीने म्हशीला बाजूला करण्यात आले. ही घटना रायबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Recent Comments