जे काही लिहिले ते सगळे साहित्य नसते. अनुभवाच्या अंतर्भावातून निर्माण होणारे साहित्य हेच खरे साहित्य होय. अशा मानवतावादी मूल्यांचा शोध महिलांच्या संवेदनशीलतेमध्ये आढळू शकतो असे डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांनी सांगितले.
बेळगावातील कन्नड साहित्य भवन येथे रविवारी लेखिका संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या अधिकारग्रहण समारंभाचे उद्घाटन करून बोलताना डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांनी सांगितले की, “साहित्य क्षेत्रातील व्यक्तींनी लेखनापेक्षा वाचनाची सवय लावावी. तरच अंतर्दृष्टी आणि बाह्य दृष्टी म्हणून नवीन साहित्यनिर्मिती शक्य होईल.

यावेळी प्रमुख पाहुण्या अखिल भारत वीरशैव महासभेच्या अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद म्हणाल्या, चन्नम्माच्या भूमीच्या महिला म्हणवणारे आपण, आपले साहित्यही समृद्ध झाले पाहिजे. देश, महिला स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाला प्रेरणा देणाऱ्या साहित्य लेखिका संघटनेच्या सदस्यांकडून आले पाहिजे.
लेखिका संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या जयशीला ब्याकोड यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी महिलांचे विश्व समृद्ध करणारे साहित्य लिहू आणि विकसित करू असे सांगितले.
कार्यक्रमात शैलजा भिंगे, ज्योती माळी, ज्योती बदामी. सुनंदा एम्मी, विद्या हुंडेकर, गुरुदेवी हुलेप्पनवरमठ आदी उपस्थित होते.


Recent Comments