Belagavi

भाजप ग्रामीण मंडळतर्फे सात हजार रोपांचे वितरण, वृक्षारोपण 

Share

भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आज, रविवारी सात हजार रोपांचे वितरण तसेच वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी भाजप नेते कर्नाटक फॉरेस्ट डेवलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक सुरेश देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच भाजप बेळगाव विभाग संघटन सरचिटणीस जयप्रकाशजी यांच्या हस्ते नारळ फोडून वृक्ष भरलेले 16 ट्रॅक्टर रवाना करण्यात आले. महिला मोर्चा अध्यक्षा भाग्यश्री कोकीतकर यांच्या हस्ते गाडीची पूजा करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, काही वर्षांपूर्वी सरकारी जागेमध्ये आम्ही वृक्षारोपण करत होतो. पण त्याची जोपासना होत नसल्याने बरीच झाडे नाश होत होती. पण गेल्या 2 वर्षा पासुन आम्ही ग्रामीण विधान सभा क्षेत्रातील प्रतेक महाशक्ति केंद्रामधून ट्रॅक्टरच्या माध्यमातुन सामान्य जनतेला व कार्यकर्त्याना रोपे वितरण करून आपल्या परसु किंवा दारामध्ये तसेच शेतामध्ये झाडे लावणे व त्या झाडांना आपल्या घरातील लहान मुलाचे नाव देणे व आपल्या घरातील लहान मुलाप्रमाणे जोपासणे ही मोहीम राबवली आहे.

यावेळी खानापूर भाजप नेते किरण येळ्ळूरकर, रामचंद्र मनोळकर, उपस्थित होते, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ सरचिटणीस पंकज घाडी, संजय अष्टेकर, नारायण पाटील, लिंगराज हिरेमठ, बाळू पाटील, लक्ष्मण चोपडे, येतेश हेबाळकर, गुरूराज हलगती, भुजंग सालगुडे, सुरेश घोरपडे, मिथिल जाधव, ओंकार पाटील, राजू जळगेकर, सचिन कांगले, हेमंत पाटील आदी उपस्थित होते.

Tags: