बेळगावचे कांदा मार्केट हे अहमदी कुटुंबाचे आहे. परंतु, इनामदार कुटुंबीय याप्रकरणी केवळ अडचणी निर्माण करत असल्याचे वकील तेजपाल कमल यांनी सांगितले.
बेळगाव शहरात रविवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना, वकील तेजपाल कमल म्हणाले की, बेळगावमधील कांदा मार्केटच्या मालमत्तेबाबत काही लोकांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे चुकीची माहिती दिली आहे. याप्रकरणी खटला दाखल केलेले वक्फ बोर्ड हरले आहे. त्यामुळे अजीम पाशा इनामदार, कामिल बुकार, लतीफ खान पठाण यांनी ही मालमत्ता इनामदार कुटुंबाची असल्याचे चुकीचे प्रसिद्धीपत्रक जारी केले. तसेच ही जागा आमची असल्याचा दावाही त्यांनी केला. तो दावाही न्यायालयाने फेटाळून लावला. इनामदार कुटूंबातील काहीजण केस डिसमिस केल्याची प्रत घेऊन केसचा निकाल आमच्या बाजूने लागल्याची चुकीची माहिती सर्वत्र देत आहेत. बेळगावातील जनतेला सत्य माहित व्हावे या उद्देशाने आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे असे ऍड. तेजपाल कमल यांनी सांगितले.
ही जमीन मुळात कोणाची आहे या माध्यमाच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, या जमिनीचे सर्वे नंबर 972 मधील सर्व सरकारी कागदपत्रे पाहिल्यानंतर ही मालमत्ता अहमदी कुटुंबाची असल्याचे दिसून येते. तसेच हा खटला प्रथम कनिष्ठ न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, खोटी माहिती पसरवणाऱ्यांवरही खटला दाखल करण्यात आला आहे. याबाबत न्यायालयात खटलाही प्रलंबित आहे. त्यांनी दाखल केलेल्या खोट्या खटल्याबाबत खुलासा व्हावा या उद्देशाने ही पत्रकार परिषद बोलावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments