Belagavi

परिवहन मंडळाचे कित्तूर कर्नाटक नामकरण करा : अशोक चंदरगी

Share

वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ हे नाव बदलून कित्तूर कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ करून कित्तूर कर्नाटक भागातील सर्व सरकारी बसेसवर हे नाव लिहावे, अशी मागणी कन्नड संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी केली आहे.

 

राज्य सरकारने मुंबई कर्नाटकचे ‘कित्तूर कर्नाटक’ असे नामकरण करून आठ महिने उलटले आहेत. तरीही बेळगाव महसूल विभागातील सात जिल्हा मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसवर वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ हे नाव अजूनही झळकत आहे. याबाबत कित्तूर कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ असे नाव देण्याची मागणी बेळगाव जिल्हा कन्नड संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी राज्य परिवहन मंत्री श्रीरामुलू यांच्याकडे केली आहे.

 

कन्नड कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी गेल्या शनिवारी, १६ जुलै रोजी बेंगळुरू येथे परिवहन मंत्री बी. श्रीरामुलू यांना भेटून ही मागणी केली. 17 सप्टेंबर 2019 रोजी, हैदराबाद-कर्नाटकचे नाव कल्याण कर्नाटक असे करण्यात आले आणि तेथील बसेस कल्याण कर्नाटक असे चिन्हांकित करण्यात आल्या. तसेच आमच्या भागातील बसेसवर कित्तूर कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ असे लिहिले जावे, असा आग्रह त्यांनी केला. या संदर्भात सरकार लवकरात लवकर योग्य तो आदेश जारी करेल, असे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले आहे.

Tags: