चंदूरटेक गावच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ हादरले आहेत.

चिक्कोडी तालुक्यातील चंदूरटेक गावच्या परिसरात बिबट्या दिसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चिक्कोडी तालुक्यातील येडूर, चंदूर, येडूरवाडी, चंदूरटेक या गावांमध्ये बिबट्या दिसल्याच्या बातम्यांनी स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. आता तो नेमका बिबट्याच आहे की बिबट्यासदृश्य अन्य कोणता प्राणी आहे याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.
काल रात्री काही युवक बिबट्याचा शोध घेण्यासाठी कारने शेतात गेले होते. यावेळी रात्री 12 च्या सुमारास चंदूरटेक गावच्या रस्त्याच्या कडेला बिबट्या दिसल्याचे या युवकांनी सांगितले. तसेच मोबाईलवर बिबट्या फिरतानाचे दृश्य चित्रित केले आहे. तो बिबट्याच असल्याचे युवक स्पष्टपणे सांगत आहेत. ही बातमी समजताच शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत. बिबट्याच्या अस्तित्वाच्या वृत्ताने चंदूरटेक परिसरातील शेतकरी अधिकच चिंतेत पडले असून, वन खात्याने तातडीने शोध घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


Recent Comments