Belagavi

MVC प्रकरणांवर कार्यशाळेचे आयोजन

Share

कर्नाटक विधी सेवा प्राधिकरणातर्फे बेळगावमध्ये MVC प्रकरणांमधील बाजू आणि पुरावे यावर आधारित कार्यशाळेचे आयोजन केले होते.

बेळगाव शहरातील वकील समुदाय भवन येथे शनिवारी कर्नाटक विधी प्राधिकरण तसेच जिल्हा सर्व्हिस ऑथॉरिटी बेळगाव, बेळगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने MVC प्रकरणांवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे न्यायाधीच बी. वीरप्पनवार यांच्याहस्ते पार पडले. यावेळी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मुरलीधर पी. बी., कर्नाटक राज्य बार कौन्सिलचे के बी नायक, विनय मंगळेकर, एच. शशिधर शेट्टी, ऋषिकेश गणू, ए एन कृष्णस्वामी, प्रभू यत्नट्टी, गिरीश पाटील, मुरली मोहन रेड्डी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी वीरप्पनवार बोलताना म्हणाले, बेळगावचे वातावरण उत्तम आहे. यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन कुटुंबाप्रमाणे कार्य करावे, सर्वांचे सहकारी यासाठी अपेक्षित असून खटले निकाली काढण्यासाठी विलंब होता काम नये. जितक्या वेगाने खटले निकाली लागतील तितक्या वेगाने जनतेचा ओघ वाढेल. जरी बाहेरून दबाव असला तरी प्रत्येकाने सामंजस्याने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश मुरलीधर पी बी बोलताना म्हणाले, शिक्षण हे सतत सुरूच असते. या कार्यशाळेत वकिलांना शिकवण्यासारखे काही नाही. केवळ एकमेकांच्या समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. न्यायाधीशांनी लवकरात लवकर न्याय द्यावा यासाठी सर्वांनी खटले कसे पूर्ण करता येतील, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खटले निकाली काढण्यासाठी आपण ध्येय ठरविले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी कर्नाटक लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीचे सदस्य शशिधर शेट्टी बोलताना म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे पालन करण्याचेही निर्देश दिले आहेत. आम्ही याचे उल्लंघन करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात किंवा सूचनेत काही शंका असल्यास कार्यशाळेतील तज्ज्ञांकडून माहिती घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यशाळेला मोठ्या संख्येने वकिलांची उपस्थिती होती.

Tags: