Belagavi

राजकुमार टाकळे यांनीच मला केले हनीट्रॅप ! माझे अश्लील व्हिडिओ वेबसाइटला विकले : नव्यश्री

Share

राजकुमार टाकळे याने माझ्याशी लग्न करून माझा खासगी अश्लील व्हिडिओ बनवून एका वेबसाइटला विकल्याची माहिती माझ्याकडे आहे. मी त्याच्यामुळे हनीट्रॅप झाले आहे. यामुळे माझ्या पैशाचे आणि सन्मानाचे नुकसान झाल्याचे काँग्रेस नेत्या नव्यश्री राव यांनी सांगितले.

बेळगावात शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नव्यश्री राव यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला त्यांच्या अश्लील व्हिडीओ आणि फोटोसंदर्भात माहिती दिली. मी भारतात नसताना त्यांनी हे केले. वास्तविक मीच या प्रकरणी आधी तक्रार द्यायला हवी होती. मात्र मीच त्याना हनीट्रॅप केल्याची तक्रार राजकुमार टाकळे यांनी केली. माझ्यापर्यंत कोणतेही पोलिस पोहोचलेले नाहीत. तक्रार देण्यासाठी मी सोमवारी बेळगावात आले. पण त्या दिवशी माझ्यावर खूप दडपण असल्याने मी तक्रार दिली नाही, असे नव्यश्री यांनी सांगितले.

नव्यश्री पुढे म्हणाल्या की, मी पक्षाच्या जबाबदार पदावर आहे. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्या सोबतचा  माझा फोटो त्यांनी ट्रोल केलाय. मीडियामध्ये माझ्याविरोधात खोटा प्रचार केला जात आहे. माझ्यावरील दबावामुळे मी सोमवारी तक्रार दिली नाही. व्हिडिओ आणि फोटो कुठपर्यंत गेले हे मला माहीत आहे. माझ्याशी लग्न झालेल्या राजकुमार टाकळेनेच हा व्हिडिओ बनवल्याची मला माहिती आहे. राजकीय भविष्यासाठी मी हा त्रास सहन केला असे त्यांनी सांगितले.  दरम्यान, राजकुमार टाकळे यांच्या विरोधात तक्रार दिल्याबाबत बोलताना नव्यश्री म्हणाल्या, मी आज राजकुमार टाकळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मी पहिली पत्नी असूनही माझ्यासोबत दुसरे लग्न केल्याची तक्रार दाखल केली आहे. फसवणूक, अपहार, चारित्र्यहनन, घोटाळा याबाबत तक्रारीत नमूद केले आहे. माझा पॉर्न व्हिडिओ बनवून वेबसाइटला विकल्याची माहिती आहे. म्हणूनच त्यानी मला हनीट्रॅप केल्याची तक्रार दिली आहे असे त्यांनी सांगितले.

याच वेळी, त्याने मला धमकी दिली आणि पैसे उकळले. व्हिडिओमुळे माझा पैसा आणि प्रतिष्ठा नष्ट झाली आहे. त्यामुळे माझ्याविरुद्धची खोटी तक्रार फेटाळण्याची विनंती मी न्यायालयाला केली आहे. हा व्हिडिओ कुमारकृपा सरकारी अतिथीगृहात काढला आहे. त्यामुळे सरकारी गेस्ट हाऊसचा गैरवापर केल्याप्रकरणी मी हायग्राऊंड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. काल संध्याकाळी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. डीसीपी स्नेहा मॅडम यांना माझ्यावरील अन्यायाबद्दल सांगितले. मला घरामध्ये कोंडून मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. हल्ल्यानंतर दाखल झालेल्या एमएलसीबद्दल मी पोलिसांना माहिती दिली आहे. मे 2021 मध्ये, माझा राजकुमार टाकळेशी बेंगळुरूमध्ये विवाह झाला आहे असे त्यांनी सांगितले. बाईट

Tags: