Hukkeri

चित्रकलेच्या माध्यमातून मुलांमध्ये डेंग्यू आजाराबाबत जनजागृती

Share

हुक्केरी शहरात शालेय मुलांसाठीडेंग्यू नियंत्रण, पर्यावरण स्वच्छता आणि माझी भूमिकाया विषयावर चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून डेंग्यूविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

आरोग्य व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात गट शिक्षणाधिकारी मोहन दंडिन यांनी सांगितले की, डेंग्यू जनजागृती महिन्याचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी डेंग्यू रोगाचा प्रसार, नियंत्रण आणि प्रतिबंध या बाबींवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या आजारापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.त्यानंतर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी डेंग्यू आजारावर चित्रे रेखाटली.स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण केल्यानंतर बेळगावचे जिल्हा रोग नियंत्रण अधिकारी डॉ. पल्लेद म्हणाले की, लहान मुलांमध्ये डेंग्यूचे मोठ्या प्रमाणावर आढळणारे प्रमाण पाहता, डेंग्यू जनजागृती महिना राज्यभर साजरा करण्यात येत आहे. रोगाची लक्षणे आढळताच पालकांनी तातडीने मुलांना जवळच्या सरकारी इस्पितळात दाखल करून उपचार करावेत. यावेळी क्षेत्र संसाधन अधिकारी ए.एस.पद्मण्णावर, जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक कुंभार, हुक्केरी तालुका वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नवीन भायनायक व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: