Athani

नूतन एसपी संजीव पाटील यांची अथणी पोलीस ठाण्याला भेट

Share

बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर एसपी डॉ. संजीव पाटील यांनी आज अथणी पोलिस स्टेशनला भेट दिली.

बेळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्त झाल्यानंतर आज प्रथमच एसपी डॉ. संजीव पाटील यांनी अथणी पोलिस स्टेशनला भेट दिली. यावेळी अथणी पोलिसांतर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली

त्यानंतर अथणीचे पीएसआय कुमार हाडकर व कर्मचाऱ्यांच्या हस्ते एसपी डॉ. संजीव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर अथणी पोलिस स्टेशनचे एएसआय, तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची वैयक्तिक माहिती दिली.प्रसारमाध्यमांसोबत पत्रकार परिषद घेऊन एसपी डॉ. संजीव पाटील म्हणाले की, मार्च महिन्यात अथणी पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आला होता. हा अपघात असल्याचे भासविण्यात आले होते. या खून प्रकरणी अथणी पोलिसांनी कसून तपास करून तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असे पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली अथणीचे सीपीआय शंकरगौडा बसनगौडा, पीएसआय कुमार हाडकर यांच्या नेतृत्वाखाली एएसआय वाय.रामोजी, पी. बी. नाईक, ए.ए. इरकर, एम. बी. दोडमणी, आर. ए. कामटे, प्रशांत अलमट्टी, एम.एम. खोत आदींनी या खून प्रकरणाचा छडा लावला आहे. त्याबद्दल एसपी संजीव पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

 

Tags: