आधुनिक जीवनशैली व औद्योगिकीकरण व जंगलांचा ऱ्हास यामुळे पर्यावरण प्रदूषित होत असून जैवविविधता धोक्याच्या मार्गावर असल्याचे मत धर्मस्थळ ग्रामविकास संस्थेचे जिल्हा संचालक प्रदीप शेट्टी यांनी व्यक्त केले.
धर्मस्थळ ग्राम विकास योजना बेळगाव तालुका, तलाव विकास समिती मन्नूर, ग्रामपंचायत आंबेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात धर्मस्थळ योजना ‘आमचा गाव-आमचे तळे’ योजनेतील तलावाच्या आवारात रोपांना पाणी घालून रोप लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन प्रदीप शेट्टी यांनी केले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, “वनस्पती आणि झाडे ही संपूर्ण आयुष्यभर फळेअन्न, पाणी, सावली आणि आरोग्य देतात. त्यामुळे झाडांचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना तलाव समितीचे अध्यक्ष मुकुंद तरळे म्हणाले, “गावातील लोकांच्या सहकार्याने आम्ही तलावाचे काम करू शकलो आहोत. तलावाभोवती चांगली रोपे लावण्यात आली आहेत आणि आम्ही त्यांचे संरक्षण करून पर्यावरणाचे रक्षण करेल.”
याप्रसंगी, साई दीपा नेत्र रुग्णालयाच्या वतीने आंबेवाडी गावातील हनुमान मंदिराच्या सभा भवनात धर्मस्थळ योजनेद्वारे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात 112 सदस्यांची तपासणी करण्यात आली. 
तालुका नियोजन अधिकारी नागराज हडली, ग्रामपंचायत उपाध्यक्षा सरिता नायक, मधुकर चौगले, संदीप डोणकरी, कृषी पर्यवेक्षक सतीश व संगीता, उमेश चौगले, अनिल काकतकर, सुजीत मंडोळकर, मुरलीधर बाळेकुंद्री, नारायण शहापूरकर, ग्राम पंचायत सदस्य, जयश्री नायक, कमल कांबळे, गायत्री काकडे, सुरेखा, मंदिर पंच समिती सदस्य, हिंदूवी स्वराज्य संघटना सदस्य, गोल्ड कॉईन ग्रुप सदस्य, कृषी व ट्रॅक्टर संघटना सदस्य, शहरातील ग्रामस्थ, शाळकरी मुले, योजना संघाचे सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते.


Recent Comments