Belagavi

बेळगावात एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

Share

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीची हत्या करून स्वतःही गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बेळगावच्या बसव कॉलनीत घडली आहे.

होय, एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीची हत्या करून स्वतःही गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी उघड झाली. खून झालेली तरुणी रेणुका ही बेळगाव येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होती. मूळच्या सौंदत्ती येथील रामचंद्र बसप्पा तेनगी याने आधी रेणुका हिची हत्या केली त्यानंतर गळफास घेवून स्वतःही आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस स्थानकाचे सीपीआय मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. डीसीपी रवींद्र गडादी यांनी याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही घटना बेळगावच्या एपीएमसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. अनैतिक संबंधातुन त्याने एका महिलेची हत्या केल्याची माहिती आहे.  त्यानेही गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत या तरुणाने मृत्यूपूर्वी देठ नोटही लिहिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून तपासातच सत्य समोर येईल, असे सांगितले.

Tags: