Belagavi

कागवाडमध्ये चोरीच्या प्रकरणात वाढ पोलिसांच्या अकार्यक्षमतेविरोधात गृहमंत्र्यांना निवेदन आमदार श्रीमंत पाटील यांची माहिती

Share

गेल्या काही महिन्यांपासून कागवाड मतदारसंघातील गावांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, हे रोखण्यात कागवाड पोलिसांना अपयश येत असून याविरोधात मी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याची माहिती कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी सांगितले.

कागवाड मतदारसंघ परिसरात दिवसाढवळ्या छापे, घरफोड्या, नदीकाठच्या पंप संच चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणांचा तपास करून चोरट्यांना पकडण्यात कागवाड पोलिसांना अपयश आले आहे. जुगुळ गावात घरावर दरोडा घालून १६ लाख रुपये किमतीचे सोने चोरीला गेले आहे. अशा अनेक प्रकरणांची चौकशी आणि तपास करण्यासाठी अनेकवेळा पोलीस बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत.

परंतु आजतागायत चोरट्यांना पकडण्यात आलेले नाही. परिस्थिती जैसे थे आहे. येथील जनतेच्या समस्या, मागण्या त्यांच्या निदर्शनात आणून देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या या अपयशाबद्दल आपण गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांना सविस्तर माहिती दिली असून जिल्हा पोलीस प्रमुखांना यासंदर्भात कडक आदेश देखील दिले आहेत, असे आमदार श्रीमंत पाटील म्हणाले.

यावेळी मदभावी येथे ग्रामीण पोलीस स्थानक स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन श्रीमंत पाटील यांनी नागरिकांना दिले आहे. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य विनायक बाग, आर एम पाटील, राम सड्डी, अब्दुल मुल्ला, मुर्गेप्पा मगदूम आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: