Chikkodi

काँग्रेसने दिलेले आश्वासन पाळले नाही : महांतेश कवटगीमठ

Share

चिकोडी सदलगा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाल्यास महालक्ष्मी सिंचन प्रकल्प अंमलात आणण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन जलसंपदा मंत्री एम बी पाटील यांनी या भागातील जनतेला दिले होते. यावर विश्वास ठेवून जनतेने काँग्रेस उमेदवाराला विजयी केले मात्र काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, असा आरोप विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी केलाय.

चिकोडी तालुक्यातील चिंचणी सिद्ध मठाच्या सभागृहात झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सत्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार गणेश हुक्केरी यांना जनतेने साथ दिली. मात्र काँग्रेस पक्षाचे नेते महालक्ष्मी सिंचन प्रकल्प राबविण्यात अपयशी ठरले. राज्यात आलेल्या संमिश्र सरकारच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री डी के शिवकुमार यांच्याकडेही अनेकवेळा मागणी करण्यात आली मात्र त्यांनीही यासंदर्भात रस दाखविला नाही. यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तसेच माजी मुख्यमंत्र्यांनी हि योजना राबविण्यासाठी पाठपुरावा केला आणि प्रकल्पाला मंजुरी दिली, असे महांतेश कवटगीमठ म्हणाले. यावेळी चिंचणी सिद्धसंस्थान मठाचे अल्लमप्रभू स्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, महालक्ष्मी सिंचन प्रकल्प या भागातील १९ गावांसाठी उपयुक्त ठरणार आहे. महांतेश कवटगीमठ हे लोकनेते आहेत. या प्रकल्पासाठी गेल्या दशकापासून सुरु असलेल्या आंदोलनाला आता यश आले असून सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद असल्याचे स्वामीजी म्हणाले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमास अभय पाटील, रामगौडा पाटील, सुरेश डांगेर, आनंद चौगुला, शिवानंद चौगुला, श्रीनिक केंचगौड, विजय अलगौडा, हलप्प मादप्पगोळ, सौरभ पाटील, सुकुमार अप्पाजीगोळ आदी उपस्थित होते.

Tags: