Belagavi

राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मु; भाजप ग्रामीण मंडळतर्फे विजयोत्सव

Share

देशाच्या 15 व्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मु यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त आज भाजप बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने हिंडलगा येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला.

राष्ट्रपतीपदी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी आज, शुक्रवारी सकाळी विजय नगर हिंडलगा  येथील भाजप बेळगाव ग्रामीण कार्यालयात विजयोत्सव साजरा केला. फटाके फोडून व लाडू वाटून भाजप कार्यकर्त्यांनी व जनतेने विजयोत्सव साजरा केला. याप्रसंगी बोलताना भाजप बेळगाव ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी, देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासी समाजाच्या महिला राष्ट्रपती झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे  देशातील आदिवासी समाजाला यानिमित्ताने न्याय मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजप ग्रामीण मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.

Tags: